गेवराई - येथील सावता नगर भागातील एका महिलेचा विद्युत बोर्डात टीव्हीची पिन लावतांना विजेचा जबरदस्त शॉक बसल्याने दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना आज (दि.१९) रोजी सकाळी घडली. वैशाली लक्ष्मण कोलते असे मृत्यु झालेल्या महिलेचे नाव आहे.
वैशाली कोलते (वय-३५) या गेवराई येथील सावता नगर भागातील त्यांच्या आई वडिलांकडे राहत होत्या. आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास टीव्हीची पिन विद्युत बोर्डात लावत असतांना अचानक त्यांना विजेचा शॉक बसला. यामुळे त्या बेशुध्द झाल्या. त्यांना तात्काळ गेवराईतील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी बीड जिल्हा रूग्णालयात रेफर केले. जिल्हा रूग्णालयात दाखल झाल्यानंतर सकाळी १०.३०च्या सुमारास डॉक्टरांनी तपासून वैशाली कोलते हिस मयत घोषित केले.
बातमी शेअर करा