Advertisement

अंकुश नगर हत्या प्रकरणातील आरोपी जेरबंद

प्रजापत्र | Sunday, 11/01/2026
बातमी शेअर करा

बीड दि.११ (प्रतिनिधी)ः शहरातील अंकुश नगर भागातील रस्त्यावरील पाईपलाईनचे काम करत असलेल्या नगरपालिकेतील कंत्राटी कर्मचारी हर्षद तुळशीराम शिंदे (वय 38) याचा मंगळवारी भरदुपारी निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला होता. या घटनेनंतर आरोपीने धुम ठोकली होती. अखेर चार दिवसानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखा व शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. कळंबवरून केजकडे येत असताना आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकीसह मुसक्या आवळ्या आहेत.
हर्षद तुळशीराम शिंदे (वय 38) याचा आरोपी विशाल उर्फ बप्या सुर्यवंशी याने मंगळवारी अज्ञात कारणातून खुन केला होता. हर्षद शिंदेवर सुरूवातीला बप्याने दोन गोळ्या झाडल्या मात्र त्या गोळ्या हर्षदला न लागल्यामुळे तो तिथून पळून जात असताना त्याचा पाठलाग करून विशालने हर्षदची हत्या केली. अंकुशनगर भागात घडलेल्या या थरारक घटनेमुळे खळबळ उडाली होती. मंगळवारी घटना घडल्यापासून आरोपीच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन व शिवाजी नगर पोलिसांचे एक पथक मागावर होते. अखेर रविवारी सायंकाळच्या सुमारास कळंबवरून केजकडे येत असताना दुचाकीसह आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेचे व शिवाजी नगर पोलिसांच्या टीमने ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. थोडयावेळात आरोपीला शिवाजी नगर पोलिस ठाण्यात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. हत्याचे कारण अद्याप समोर आलेले नसून पोलिसांच्या चौकशी नंतर खरे कारण समोर येणार आहे
.

Advertisement

Advertisement