मुंबई :मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. तसेच उद्धवसेना आणि मनसे या ठाकरे बंधूंच्या पक्षांच्या युतीने प्रचारामधून भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. तसेच मराठी भाषा आणि मुंबईमधील मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू आणि संजय राऊत हे भाजपाविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत. दरम्यान, ठाकरे आजही दहा मिनिटांमध्ये मुंबई बंद करू शकतात, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
महानगपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय राऊत म्हणाले की, ठाकरे आजही दहा मिनिटांत मुंबई बंद करू शकतात. ठाकरे कुटुंबाने दीर्घकाळापर्यंत राज्याच्या राजकारणाला दिला धिली आहे. ठाकरेंना कधीही संपवता येणार नाही, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
बातमी शेअर करा

