मिरज : केवळ राजकीय स्वार्थासाठी जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे योग्य नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिरजेत पक्षाच्या प्रचारसभेत स्पष्ट केली.
मिरजेसारख्या आरोग्यपंढरीला आरोग्य सेवेचा मोठा वारसा आहे. त्यामुळे बंद असलेले वॉन्लेस हॉस्पिटल पुन्हा सुरू करणे गरजेचे आहे, असे सांगून त्यांनी सांगलीतील ड्रेनेजच्या प्रश्नावरही भाष्य केले. ते पुढे म्हणाले, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनी राजकारण करतो. राजकीय स्वार्थासाठी जाती-धर्मांत तेढ निर्माण करणे योग्य नाही. काही पक्ष २४ तास सात दिवस पाणी देण्याचे आश्वासन देतात, पण ते अशक्य आहे.
सभेत आझम काजी यांच्या समर्थकांनी त्यांच्याविषयी संवाद साधण्यासाठी आग्रह धरला, पण अजित पवार यांनी यावर भाष्य टाळलं. प्रभाग ३ मधील शिंदेसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांनी येऊन अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी मंत्री मकरंद पाटील, माजी खा.संजय पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक, आमदार इद्रिस नायकवडी, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे आणि अन्य उमेदवार उपस्थित होते.

