बीड दि.१५(प्रतिनिधी):बीड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदाच्या १४७ रिक्त पदांसाठी पोलीस शिपाई भरती २०२४-२५ प्रक्रियेत आऊटडोर परिक्षा पात्र ठरलेल्या १९०७ उमेदवारांसाठी आज लेखी परिक्षा घेण्यात आली. १९०७ पैकी २९ उमेदवार गैरहजर राहिल्याने एकूण १८७८ उमेदवारांनी ही लेखी परिक्षा दिली आहे. अत्यंत पारदर्शक पध्दतीने झालेल्या या प्रक्रियेचा लेखी परिक्षा हा महत्वाचा टप्पा होता. स्वतः पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, गृह विभागाचे डीवायएसपी उमाकांत कस्तुरे हे त्या ठिकाणी बंदोबस्तासह उपस्थित होते. दरम्यान आज सायंकाळी पोलीस दलाच्या वेबसाईटवर आन्सर की जाहीर करण्यात येणार असून त्यानंतर आक्षेपासाठी २४ तास दिले जाणार आहेत. आक्षेप प्रक्रिया पुर्ण होताच अंतीम निकाल जाहीर होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
बातमी शेअर करा

