पुणे : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या परिसरातच आज (दि.२५) गोळीबाराची घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार ७ आरोपींनी कोर्ट परिसरात एका व्यक्तीवर गोळीबार केला. ती व्यक्ती स्वत:चा बचाव करुन पळत असतानाच त्याच्यावरतीच कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. यात त्या पीडित व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. ही घटना 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पुणे शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर गेट नंबर ४ च्या परिसरात ही घटना घडली. ज्या व्यक्तीवर हल्ला झाला, त्या व्यक्तीला ससून रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार हल्ला झालेली व्यक्ती ही प्रकरणातील साक्षीदार होती, अशी माहिती आहे.
ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला, ती व्यक्ती पळत असताना त्याचा पाठलाग करुन कोयत्याने हल्ला करण्यात आला. शिवाजीनगर कोर्ट ते फॅमिली कोर्टाच्या परिसरात हे घडलं. शिवाजी नगर कोर्टाच्या गेट नंबर ४ च्या परिसरात नेहमी नागरिकांची वर्दळ असते अशा ठिकाणी हा हल्ला झाला. तर मंदार किवळे असं त्या व्यक्तीचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. कात्रजचा रहिवासी असल्याची माहिती आहे. तर शुभम चव्हाण मर्डर केस मधील आरोपी असल्याची माहिती आहे. पुणे शहर पोलिसांमध्ये पोलीस उपायुक्त (DCP) डॉ.संदीप भाजीभाकरे यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, मंदार किवळे असं त्या व्यक्तीचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. वय ३५ एक वाजण्याच्या सुमारास कोर्टासमोर त्यावरती हल्ला केला, चार जणांनी हल्ला केला, ससूनमध्ये उपचारासाठी आणलं असल्याची माहिती आहे. शुभम चव्हाण मर्डर केस मधील आरोपी असल्याची माहिती आहे. वैयक्तीक वैमनस्यातून ही घटना घडली असल्याची माहिती आहे. कोर्टातील तारखेसाठी तो व्यक्ती कोर्टात आला होता, त्याची आज कोर्टात तारीख होती, त्यावेळी त्याच्यावर कोयत्याने आणि बंदुकीने हल्ला केला असल्याची माहिती आहे.
त्याचबरोबर आरोपींची ओळख पटली आहे, घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

