Advertisement

मंत्री छगन भुजबळ यांच्यानंतर धनंजय मुंडे यांना धमकीचा फोन

प्रजापत्र | Tuesday, 11/07/2023
बातमी शेअर करा

 

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडत अजित पवार यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये स्थापन झालेल्या दोन मंत्र्यांना धमकीचे फोन आले आहेत. याआधी मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली होती. त्या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक देखील केली आहे. मात्र त्यातच आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील परळी या गावाच्या निवासस्थानी धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. इतकच नाही तर धनंजय मुंडे यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीने 50 लाख रुपयांची मागणी देखील केली आहे.

 

राज्यात सत्ता संघर्षादरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या. त्यानंतर शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांना धमकी आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्येच सामील झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनाही धमकीचे फोन आले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे.

Advertisement

Advertisement