माजलगाव: गुटखा वितरणाच्या गोपनीय माहितीच्या आधारे पंकज कुमावत यांच्या विशेष पथकाने माजलगाव पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैध रित्या विक्री होत असलेल्या गुटख्यावर कारवाई करीत ९ लाखाचा गुटखा जप्त केला. सहायक पोलीस अधीक्षक कुमावतानी सकाळी केलेल्या या कारवाईने सर्वत्र खळबळ माजली आहे. कारवाईत पाच आरोपींना पथकाने पकडले असून दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.
याविषयी माहिती अशी की,माजलगाव याठिकाणी एका स्कॉर्पिओ गाडीत गुटखा हा माजलगाव आणि बीड याठिकाणी वितरित केल्या जाणार असल्याची माहिती पंकज कुमावत याना मिळली होती त्यानुसार सकाळी 8 वाजता केज येथून पथक पाठवून त्यांनी वितरित होणाऱ्या ठिकाणी पाठवले सदरील मौलाना आझाद चौकात स्कॉर्पिओ गाडीतून गुटख्याच्या गोण्या या दुसऱ्या स्विफ्ट गाडीत भरण्यात येत असताना दबा धरून असलेल्या पथकाने छापा मारत आरोपींना ताब्यात घेतले अचानक पणे छापा पडल्याने अवैध गुटखा विक्री करणारे पळून जाऊ लागले यातील पाच आरोपींना पोलिसांनी पकडले असून यातील दोन आरोपी पळून गेले आहेत.या कारवाईत राजनिवास कंपनीच्या गुख्याच्या 32 बोऱ्या जप्त केल्या असून त्याची किंमत 1लाख 60 हजार इतकी आहे जाफरणी जर्दा 40 हजार सोर्पिओ गाडीची 3 लाख आणि स्विफ्ट गाडी 3 लाख आणि जप्त केलेले मोबाईल असा ऐकून 9 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला आहे झालेल्या कारवाईत त्रिंबक अनंत डुकरे,ज्ञानेश्वर होंडे,सचिन सुरवसे,बाबासाहेब वरेकर,अशोक वरपे आणि इतर दोन अश्या सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. या पथकात पो ना बांगर,पो ना भडाणे,पो ना वंजारे यांचा समावेश होता