परळी वै.दि.३० (वार्ताहर)-तालुक्यातील सारडगाव येथे एका किराणा दुकानाला आग लागून २ लाखांचे माल जाळून खाक झाल्याची घटना रविवारी (दि.३०) समोर आली आहे.मनोज राजेंद्र गायकवाड यांच्या मालकीचे हे दुकान असून ते दिव्यांग आहेत.घटनेची माहिती मिळाल्यानंतर डॉ. संतोष मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
परळी तालुक्यातील सारडगाव येथे दिव्यांग मनोज राजेंद्र गायकवाड यांचे अचानक लागलेल्या आगीत किराणा व जनरल स्टोअर्स आगीत भस्मसात झाले. दिव्यांग बांधव मनोज गायकवाड यांचे किराणा व जनरल सटोअर्स या दुकानाचे अंदाजे दोन लाखांपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामध्ये दुकानातील,सर्व भरलेला माल व फर्निचरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.डॉ.संतोष मुंडे यांनी सारडगाव येथे जाऊन नुकसानग्रस्त दुकानाची पाहणी केली. दिव्यांग बांधव मनोज गायकवाड यांना धीर दिला. तसेच डॉ. संतोष मुंडे यांनी तातडीने तलाठी यांच्या मार्फत तात्काळ पंचनामा करून घेतला.