Advertisement

  ‘प्रहार’ने नेली बीडीओच्या दालनात तिरडी

प्रजापत्र | Monday, 09/08/2021
बातमी शेअर करा

 

 

गेवराई  दि.९ (वार्ताहर)- ग्रामपंचायत स्थरावर देण्यात येणार्‍या वित्त आयोगातील निधीतून अंध ,अपंग,मुकबधीर यांना अर्थसहाय्य म्हणून ५ टक्के निधी व घरकुल देणे बंधनकारक असताना देखील सन २०१८ पासून हा निधीचा लाभ तालुक्यातील ग्रामपंचायतीने अपंग, मुकबधीर यांना दिला नाही. त्यामुळे गेवराई येथे सोमवारी प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी बीडीओच्या दालनात तिरडी घेऊन जात प्रहार संघटनेने अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

 

 

 सविस्तर माहिती अशी की, शासन दरवर्षी ग्रामपंचायतींना वित्त आयोगातून लाखोंचा निधी येतो . दरम्यान या निधीतील ५ टक्के हा अपंग, मुकबधीर यांना अर्थसहाय्य म्हणून खर्च तसेच घरकुल योजनेचा लाभ देणे बंधनकारक आहे . मात्र सन २०१८ पासून हा निधी अंध,अपंग, मुकबधीर यांना लाभ देण्यात आला नसल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला आहे . दरम्यान याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने निषेध नोंदविण्यासाठी प्रहार संघटनेचे गेवराई तालुका अध्यक्ष नंदकुमार झाडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी तिरडी आंदोलन करण्यात आले. येथील शास्त्री चौकातून आंदोलन सुरू करण्यात येऊन हि तिरडी थेट पंचायत समितीतील गटविकास अधिकारी यांच्या दालनात नेऊन प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात अंध, अपंग यांच्यासह प्रहार संघटनेचे पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

 

हेही वाचा... 
 विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू 
http://prajapatra.com/2856

Advertisement

Advertisement