किल्लेधारूर दि.२२ (प्रतिनिधी) तालुक्यातील असोला येथे सोमवार (दि.२१) रोजी रात्री १२ च्या दरम्यान नांदूरकीच्या झाडावर वीज पडल्याने शहाजी सखाराम चोले या शेतकऱ्याची एक म्हैस व एक गाय अशी दोन जनावरे दगावली आहेत .
धारूर तालुक्यात काही ठिकाणी वादळ वारासह पाऊस कोसळला.आसोला येथे शहाजी सखाराम चोले या शेतकऱ्याची एक म्हैस व एक गाय अशी दोन जनावरे सोमवार (दि.२१) रोजी मध्यरात्री वीज पडल्यामुळे दगावली. या ठिकाणचा पंचनामा प्रशासनामार्फत करण्यात आला असून या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामा तलाठी एस.बी.बनकर यांनी केला असून या दोन्हीही जनावरांचे शविच्छेदन धारूर येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे.प्रशासनाने या शेतकऱ्यास मदत देण्याची मागणी होत आहे.
बातमी शेअर करा