Advertisement

 खंजीर घेऊन दहशत पसरविणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

प्रजापत्र | Tuesday, 22/07/2025
बातमी शेअर करा

बीड दि.२२(प्रतिनिधी): शहरातील (Beed)खासबाग अडत मार्केट येथे हातात खंजीर घेऊन दहशत पसरविणाऱ्या इसमाला पकडून (Crime)गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सोमवार (दि.२१) रोजी बीड शहर पोलिसांनी केली आहे. 

            शेख सादिक शेख बशीर रा.अडत मार्केट, खासबाग, (Beed)बीड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो सोमवार (दि.२१) हातात खंजीर घेऊन अडत मार्केट परिसरात फिरत होता. यामुळे या परिसरात दहशत पसरली होती. याची माहिती मिळताच बीड (Beed police)शहर पोलिसांनी धाव घेत संबंधित आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात पोलीस अंमलदार शहेनशाह सय्यद यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेख सादिक बशीर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक वाळके करीत आहेत.

Advertisement

Advertisement