माजलगाव - गुप्त माहितीच्या अआधारे माजलगाव ग्रामीण पोलिसांनी केसापुरी परिसरात कारवाई करत एका घरातून २ लाख ४० हजार रुपयांचा गुटखा पकडला. ही कारवाई बुधवारी (दि.०९) दुपारी १२.२० वाजता करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी ऋषिकेश रत्नाकर मिसळ आणि लक्ष्मण माणिकराव निंबाळकर (रा.केसापुरी) या दोघांवर गुन्हा नोंदवला असून दोघेही फरार झाले आहेत. पोलिसांनी गुटखा जप्त करून त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवून दिले. ही कारवाई पोलीस निरिक्षक प्रकाश मुंडे, पोलीस कर्मचारी खराडे. खताळ, वाघमारे यांनी पार पाडली.
बातमी शेअर करा