Advertisement

निर्मला सीतारमण यांची LIC एजंट आणि कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा

प्रजापत्र | Monday, 18/09/2023
बातमी शेअर करा

आज अर्थ मंत्रालयाने भारतीय आयुर्विमा महामंडळ कर्मचारी आणि LIC एजंटसाठी अर्थ मंत्रालयाने त्यांच्यासाठी ग्रॅच्युइटीची मर्यादा, मुदत विमा संरक्षण आणि कौटुंबिक पेन्शनसाठी मोठी घोषणा केली आहे.

 

अर्थ मंत्रालयाने कोणत्या निर्णयांना दिली मंजुरी?

 

1. एलआयसी एजंटसाठी ग्रॅच्युइटीची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे आणि याद्वारे त्यांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा होईल आणि एलआयसी एजंटना फायदा होईल.

2. एलआयसी एजंटसाठी मुदतीचे विमा संरक्षण वाढविण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांसाठी टर्म इन्शुरन्स कव्हर 3000-10,000 रुपयांवरून 25,000-1,50,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.मुदत विम्याची रक्कम वाढवून, निधन झालेल्या एलआयसी एजंटच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळू शकेल, ज्यामुळे त्यांना अधिक कल्याणकारी लाभ मिळू शकतील.

3. एलआयसी कर्मचार्‍यांच्या कल्याणासाठी त्यांना 30 टक्के समान दराने कौटुंबिक पेन्शनचा लाभ मिळू शकेल.

 

13 लाखांहून अधिक एलआयसी एजंटना होणार फायदा

अर्थ मंत्रालयाने ट्विटरवर ट्विट करून या संदर्भात माहिती दिली आहे. एलआयसी एजंट आणि कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी योजनांना मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. याचा फायदा कंपनीच्या एक लाखाहून अधिक नियमित कर्मचारी आणि 13 लाखांहून अधिक एजंटांना होणार आहे.

Advertisement

Advertisement