बीड-शहरातील अंकुश नगर भागात रस्त्यावरील पाईपलाईनचे काम करत असलेल्या नगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्याचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी (दि.६) दुपारी घडली होती.आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांनी रात्री शिवाजी नगर पोलीस ठाण्यात जाऊन आक्रमक भूमिका घेतली होती.आज सकाळी ११ वाजता जिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे.पण घटनेचे २१ तास उलटूनही नातेवाईकांच्या आक्रमकपणामुळे अंत्यसंस्कार अद्याप करण्यात आले नाहीत.त्यामुळे आरोपीला जेरबंद करण्यासाठी पोलिसांपुढे एक आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान आरोपी विशाल उर्फ बप्या सूर्यवंशीच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन तर शिवाजीनगर पोलिसांचे एक पथक रवाना झाल्याचे कळते.
मयत हर्षद तुळशीराम शिंदे (वय-३८) व आरोपी विशाल उर्फ बप्या सूर्यवंशी लहानपणापासून एकाच गल्लीतील रहिवाशी होते.दोघांचे बालपण हाऊसिंग कॉलनीत गेले.कालांतराने विशालच्या कुटुंबियांनी घर बांधल्यानंतर ते अंकुश नगर भागात राहायला गेले.लहानपणापासून मित्र असलेल्या दोघांमध्ये मंगळवारी अज्ञात कारणावरून झालेले वाद एवढे टोकाला गेले की त्यातून आधी विशालने हर्षदच्या दिशेने गोळीबार केला नंतर त्याला जीवे मारण्यासाठी पाठलाग करून धारदार शस्त्राने वार करत संपविले.भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.मयताच्या नातेवाईकांनी शिवाजीनगर ठाण्यात आरोपीच्या अटकेसाठी रात्री आक्रमक भूमिका घेतली होती.अखेर घटनेच्या २० तासानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करणे सुरु असून अजूनही अंत्यसंस्कार बाकी आहेत.त्यामुळे आता आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश कधी येते याकडे सर्वांचे लक्ष्य लागले असून स्थानिक गुन्हे शाखेचे दोन तर शिवाजीनगर पोलिसांचे एक पथक यासाठी रवाना झाल्याचे कळते.
बातमी शेअर करा
