आमच्या विरोधात सभा आणि बारामतीत अजित पवार आमचे नेते असं कसं, ते नेते आहेत तर आम्ही त्यांच्याच नेतृत्वाखाली गेलोय न, मग द्या न आम्हाला आशिर्वाद असेही भुजबळ म्हणाले. वारंवार अजित पवार आणि पटेलांना चर्चेसाठी दिल्लीला कोणी पाठवलं, आम्ही तर त्या यादीतही नव्हतो, मग आमच्याच मतदारसंघात सभा कशासाठी? आम्हाला २०१४ पासून हा रस्ता कोणी दाखवला? तो शरद पवारांनीच दाखवला. २०१९ चा शपथविधी गुगली म्हणता, मग गुगली मध्ये आपल्याच खेळाडूची विकेट काढायची असते का? हा छगन भुजबळ इडीला घाबरला नाही, जेलमध्ये गेला, पण शरद पवारांसोबतच उभा राहिला. ९१ पासून उभा राहिला, तरिही मला घाबरुन तिकडे गेला असं कसं म्हणता ? आमचं काय चुकलंय? कशासाठी आमच्यावर हल्ले करता? तुम्ही व्यक्तीगत हल्ले करायचे नाही असं शिकवलं होतं आणि आता तुम्हीच ते करताय? साहेब तुम्ही कुठून कुठे आलात असे छगन भुजबळ म्हणाले
बातमी शेअर करा