बीड येथील उत्तरदायी सभेत बोलताना कृषी मंत्री धनंजय मुंडे देखील भावनिक झाले. शरद पवारांच्या सभेत धनंजय मुंडेंनी स्वत:चा इतिहास सांगावा असे आव्हान देण्यात आले होते. त्याला धनंजय मुंडेंनी उत्तर दिले.
आज एकाच गोष्टीची खंत. माझा इतिहास सर्वांना माहितय. पण शरद पवारांच्या सभेत माझा इतिहास विचारला गेला, आज तो सांगतोय. २०१० च्या विधान परिषद निवडणुकीत मला कमी असणारी दोन मत अजित पवारांनी दिली, म्हणून हा धनंजय मुंडे इथे उभाय, मग मी अजित पवारांसोबत गेलो त्यात काय चुकलं? मी दिवंगत गोपीनाथ मुंडे कडून संघर्ष शिकलो, प्रश्नांसाठी संघर्ष करणं हा माझा इतिहास, पराभव होणार माहित असतानाही पक्षादेश म्हणून निवडणूक लढलो हा माझा इतिहास. विरोधी पक्षात असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मी संघर्ष केला, हे माझ्या दैवताने लिहून ठेवलय हा माझा इतिहास असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.