Advertisement

चुलत्याचा अल्पवयीन पुतणीवर बलात्कार

प्रजापत्र | Tuesday, 22/08/2023
बातमी शेअर करा

आष्टी -  तुझ्या आई,बापाला जिवे मारीन अशी धमकी देत अल्पवयीन पुतणीवर चुलत्याने बलात्कार केल्याची घटना आष्टी तालुक्यातील एका गावात घडली असुन या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आष्टी तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय तरूणाचे लग्न झाले होते.पण पत्नी नांदत नसल्याने तो मोठ्या भावाकडे राहत होता. जानेवारी महिन्यात या चुलत्याची नियत फिरली आणि घरी कोणी नसल्याची संधी साधुन तुझ्या आई,बापाला जिवे मारीन अशी धमकी देत अल्पवयीन पुतणीवर बलात्कार केला. तेव्हा पासून मुलगी भयभीत होऊन घाबरुन घरात राहत होती. पण रविवारी तिच्या पोटात दुखू लागल्याने आई,वडिल तिला घेऊन अहमदनगर येथील रूग्णालयात गेले असता येथील डाॅक्टरांनी तपासणी केल्यावर मुलगी गर्भवती असुन तिला सात वा महिना असल्याचे सांगताच आई,वडिलाच्या पायाखालची वाळू सरकली आणि मुलीने घडलेल्या घटनेचा उलगडा केला. रविवारी रात्री हा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात झिरो ने दाखल करण्यात आला होता. मंगळवारी अंभोरा पोलिस ठाण्यात पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी चुलत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन तो फरार आहे.याचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर याच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथक प्रभारी प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी ,पोलीस हवालदार मुद्दहर शेख करीत आहेत.

Advertisement

Advertisement