Advertisement

खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यु

प्रजापत्र | Saturday, 29/07/2023
बातमी शेअर करा

आष्टी - तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील एका तरुण शेतकऱ्याला घरा समोरील विद्युत खांबांत विद्युत प्रवाह आल्याने याला स्पर्श होताच त्याचा जागीच मुत्यू झाल्याची घटना आज (दि.२९) रोजी सकाळी घडली आहे. शशिकांत सुभाष परकाळे असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.

 
अधिक माहिती अशी कि, शशिकांत परकाळे (वय-२४) हे शनिवारी सकाळी घरासमोर बांधलेल्या जनावरांना चारा,पाणी करत असताना तिथेच असलेल्या विद्युत पोलच्या ताणाला अचानक विद्युत प्रवाह आल्याने याला स्पर्श होताच त्याचा जागीच मुत्यू झाल्याची घटना घडली.कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement