Advertisement

जुगार अड्ड्यावर छापा

प्रजापत्र | Wednesday, 19/04/2023
बातमी शेअर करा

गेवराई - तालुक्यातील गढी फाटा येथील जुगार अड्ड्यावर काल दुपारी पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकली असून यात नऊ जुगार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील मोबाईल, जुगाराचे साहित्य, मोटारसायकल आणि रोख असा एकूण 3 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गढी फाटा येथील माजलगाव रोडवरील प्रदीप शहादेव ढाकणे यांच्या शेतात जुगाराचा अड्डा सुरू होता. याची माहिती एसपींचे विशेष पथकप्रमुख विलास हजारे यांना मिळाली होती. त्यांनी आपल्या पथकासह तेथे धाड टाकली असता त्याठिकाणी जुगार खेळताना रामप्रसाद वैजिनाथ बोरुडे (रा. भाटसांगवी) विठ्ठल जीवन चौधरी (रा. मिरकाळा), लक्ष्मण आनंदराव गाडे (रा. औरंगपूर), रामप्रभू अंकुश घोडके (रा. लोळदगाव), विठ्ठल भगवान उबाळे, किसन विश्वनाथ बोरुडे (रा. भाटसांगवी), भाऊसाहेब झापा राठोड (रा. पाचेगाव), सिद्धेश्वर रामभाऊ लोणकर (रा. निपाणीजवळका), प्रदीप शहादेव ढाकणे या जुगार्‍यांवर गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या जुगार्‍यांकडून जुगाराचे साहित्य, नगदी 21 हजार रुपये, नऊ मोबाईल, पाच मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचीन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख सपोनि. विलास हजारे, पो.शि. सचीन काळे, शिवाजी डिसले, विनायक कडू यांनी केली.

Advertisement

Advertisement