Advertisement

सेवा निवृत्त अधिकाऱ्याने केली कुत्र्याची गोळी मारून हत्या

प्रजापत्र | Saturday, 12/11/2022
बातमी शेअर करा

परळी वैजनाथ (प्रतीनिधी) - धर्मापुरी रोडवरील धारावती तांडा शिवार भागातील हॉटेल वीर बियर बार व हॉटेल येथील कुत्र्याला गोळी मारून हत्या करण्याची घटना घडली असून,या घटनेमुळे परळी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

 

तालुक्यातील धर्मापुरी रोडवरील हॉटेल वीर बियर बार येथील पाळीव कुत्र्याचा पाठलाग करत घोळवे यांनी गोळी मारून हत्या करण्याची घटना घडली असून विकास बनसोडे यांचा पाळीव कुत्रा सतत भुंकतो या कारणामुळे हॉटेल शेजारील शेतकरी घोळवे ( सेवा निवृत्त अधिकारी ) यांनी हॉटेलच्या पार्किंग मधील दोन पाळीव कुत्रे असताना त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेत एका कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला असून एक कुत्रा जखमी अवस्थेत शिवारातील शेतात पळून गेला आहे, परळी ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये हॉटेल वीर बियर बार चे चालक विकास बनसोडे यांच्या तक्रारीवरून रामराजे घोळवे यांच्यावर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे हे करत आहेत. 

Advertisement

Advertisement