मुंबई - महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी काही महानगरपालिकांमध्ये भाजपाला सहाकारी पक्ष किंवा प्रसंगी विरोधी पक्षातील काही गटांचा पाठिंबा घेण्याची तजवीज करावी लागली. तर दुसरीकडे राज्यात सत्तेत एकत्र असणाऱ्या पक्षांना स्थानिक पातळीवर आपल्याच मित्रपक्षाविरोधात उभं राहण्याचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार स्थानिक नेत्यांवर देण्याची वेळ ओढवली. या पार्श्वभूमीवर एकीकडे सत्तास्थापनेबाबत जवळपास सर्वच महानगरपालिकांमध्ये राजकीय नाट्य रंगत असताना दुसरीकडे महापौरपदाची सोडत हादेखील चर्चेचा विषय ठरला होता. ही सोडत अखेर जाहीर झाली आहे.
कोणत्या महानगरपालिकेतील महापौरपद कोणत्या गटासाठी आरक्षित?
२९ महानगरपालिकांमधील आरक्षणाचं गणित
अनुसूचित जमाती – १
अनुसूचित जाती – ३
ओबीसी – ८
सर्वसाधारण प्रवर्ग – १७
याशिवाय, २९ पैकी १५ महानगरपालिकांमध्ये महिलांसाठी महापौरपद आरक्षित असणार आहे.
कोणत्या महानगरपालिकेतील महापौरपद कोणत्या गटासाठी आरक्षित?
कल्याण-डोंबिवली – अनुसूचित जमाती
ठाणे – अनुसूचित जाती
जालना – अनुसूचित जाती (महिला)
लातूर – अनुसूचित जाती (महिला)
इचलकरंजी – ओबीसी
पनवेल – ओबीसी
अहिल्यानगर – ओबीसी (महिला)
अकोला – ओबीसी (महिला)
उल्हासनगर – ओबीसी
कोल्हापूर – ओबीसी
चंद्रपूर – ओबीसी (महिला)
जळगाव – ओबीसी (महिला)
मुंबई महानगरपालिका – खुला प्रवर्ग
पुणे महानगरपालिका – खुला प्रवर्ग
छत्रपती संभाजीनगर – खुला प्रवर्ग (महिला)
धुळे महानगरपालिका – खुला प्रवर्ग (महिला)
अमरावती – खुला प्रवर्ग (महिला)
भिवंडी-निजामपूर – खुला प्रवर्ग (महिला)
मालेगाव – खुला प्रवर्ग
मीरा-भाईंदर – खुला प्रवर्ग
नागपूर – खुला प्रवर्ग (महिला)
नांदेड-वाघाळा – खुला प्रवर्ग (महिला)
पिंपरी-चिंचवड – खुला प्रवर्ग (महिला)
नाशिक – खुला प्रवर्ग
नवी मुंबई - खुला प्रवर्ग (महिला)
परभणी – खुला प्रवर्ग
सांगली-मिरज – खुला प्रवर्ग
वसई-विरार – खुला प्रवर्ग
सोलापूर – खुला प्रवर्ग

