बीड दि.२२(प्रतिनिधी):तालुक्यातील समनापूर येथून एका चोरट्याने बारा टायर ट्रक टँकरसह त्याच्यातील खाद्यतेलासह,डिझेल व इतर साहित्य असा एकूण ४२,५६,६५३ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवार (दि.१७) रोजी घडली असून चोरट्याविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्हयात चोरी,लूटमार अश्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत अश्यातच बीड तालुक्यातील समनापूर येथून सद्दाम हुसेन रा.गघरोली शाहपूर ता.कवेंतदूर जि.प्रत्तागठ या चालकाने बारा टायर ट्रकटँकर क्रमांक एमएच ४३ वाय ७५३६ यांसह त्यामधील सरकीचे २५ टन खाद्यतेल,डिझेल तसेच इतर साहित्य असा एकूण ४२,५६,६५३ रुपयांचा ऐवज घेऊन ट्रकचालक फरार झाल्याची घटना शनिवार (दि.१७) रोजी घडली असून ट्रक मालक उपेंद्र भोपाळ यादव (वय ४२) यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात बुधवार (दि.२१) रोजी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि श्री.दराडे हे करत आहेत.

बातमी शेअर करा
