Advertisement

आता व्हाट्सअँप वर पाठवलेले मेसेज करता येणार एडिट

प्रजापत्र | Monday, 19/09/2022
बातमी शेअर करा

लोकप्रिय चॅटिंग प्लॅटफॉर्म WhatsApp आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. तसेच युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं म्हणून विविध फीचर्सवर नेहमीच काम करत असतं. रिपोर्टनुसार, WhatsApp आताही अशाच एका भन्नाट फीचरवर काम करत आहे. आता WhatsApp एका अशा फीचरवर काम करत आहे जिथे युजर्सना त्यांनी पाठवलेले मेसेज एडिट करता येणार आहेत. सध्या हे फीचर जारी करण्यात आलेले नसून त्यावर काम सुरू करण्यात आले आहे. 

 

 

WABetaInfo च्या लेटेस्ट रिपोर्टनुसार, WhatsApp वर लवकरच एक नवीन फीचर येत आहे, जे युजर्सना त्यांचे पाठवलेले WhatsApp मेसेज एडिट करण्याची परवानगी देईल. या फीचरची माहिती WABetaInfo ने स्क्रीनशॉटद्वारे शेअर केली आहे. पण याबाबत अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही. परंतु हे फीचर Twitter च्या Edit Button प्रमाणे काम करते.

 

 

'असं' असणार नवं फीचर  
समोर आलेल्या माहितीनुसार, WhatsApp चे एडिट फीचर ट्विटरच्या एडिट बटणाप्रमाणे काम करेल. WhatsApp युजरने एकदा मेसेज एडिट केल्यावर समोरच्या व्यक्तीला पहिल्या मेसेजमध्ये काय लिहिले आहे ते दिसणार नाही, पण मेसेज एडिट झाला आहे हे त्यांना नक्की कळेल. मेसेजमध्ये एक संकेत देण्यात येईल ज्यामुळे तो मेसेज एडिट केला आहे हे समजेल.

 

 

 

WhatsApp वरच्या या फीचरची सध्या चाचणी केली जात आहे आणि हे WhatsApp अँड्रॉइड बीटा अपडेट व्हर्जन 2.22.20.12 वर दिसले आहे. लवकरच iOS च्या बीटा व्हर्जनवरही हे फीचर पाहता येणार आहे. WhatsApp एडिट फीचर सर्व युजर्ससाठी कधी रिलीझ होईल हे अद्याप माहीत नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Advertisement

Advertisement