केज दि.२६ (प्रतिनिधी):तालुक्यातील (Kaij)हांगेवाडी येथील घराचा दरवाजा भरदिवसा तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ६०,००० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवार (दि.२४) रोजी घडली असून (Crime)चोरट्यांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड(Beed) जिल्हयात चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.केज तालुक्यातील हांगेवाडी येथील सदाशिव मारुती हांगे (वय ६०) यांच्या राहत्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील १० ग्रॅमचे सोन्याचे दागिने,रोख रक्कम असा एकूण ६०,००० हजारांचा ऐवज बुधवार (दि.२४) रोजी सकाळी ११ ते १ च्या सुमारास भरदिवसा लंपास केल्याची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध सदाशिव हांगे यांच्या फिर्यादीवरून गुरुवार (दि.२५)रोजी केज (Kaij Police)पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्री.सोनवणे करत आहेत.भरदिवसा चोरीची घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावर निर्माण झाले आहे.

बातमी शेअर करा
