Advertisement

३२ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या 

प्रजापत्र | Thursday, 25/12/2025
बातमी शेअर करा

बीड दि.२५ (प्रतिनिधी): शहरातील जालना रोडलगत असलेल्या काजीनगर भागात राहणाऱ्या पवन अशोक काळे (वय ३२) या तरुणाने गुरुवार (दि.२५)रोजी गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

     पवन काळे यांचे वडील अशोक काळे हे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून तुतारी या निवडणूक चिन्हावर निवडून आले होते. पवन काळे हा अत्यंत मनमिळाऊ व सामाजिक स्वभावाचा तरुण म्हणून ओळखला जात होता. वडिलांच्या निवडणुकीत त्याने युवकांची फळी उभी करत घरोघरी जाऊन प्रचार
केला होता. त्यामुळे तो सर्वत्र परिचित झाला होता.मात्र, पवन काळे यांनी आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपासासाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. पवन यांच्या अचानक जाण्याने मित्रपरिवार, नातेवाईक व संपूर्ण कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात

Advertisement

Advertisement