बीड दि.१९(प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी अभिवादन करण्यासाठी येथील शिवतिर्थावर मोठा जनसागर उसळला होता. सकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून प्रतिमेचे शासकीय महापुजन करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, शल्यचिकित्सक डॉ. सतिशकुमार सोळंके, न.प. चे मुख्याधिकारी शैलेश फडसे, तहसीलदार चंद्रकांत शेळके,आ.संदीप क्षीरसागर यांची उपस्थिती होती. त्यानंतर आ.विजयसिंह पंडित, नगराध्यक्षा प्रेमलता पारवे, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, सभापती शेख निजाम, गटनेते फारूक पटेल, कल्याण आखाडे, दिलीप गोरे, भिमराव वाघचौरे, सीए बी.बी. जाधव, झुंजार धांडे, संदीप आदमाने, मनोज गोडसे, अमर नाईकवाडे यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. डॉ.योगेश क्षीरसागर, दत्ता गायकवाड, नागेश तांबारे, गणेश जाधव यांच्यासह शिवप्रेमी, सर्व सामान्य नागरीक यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. जय भवानी जय शिवाजी, जय शिवराय अशा घोषणांनी बीड शहर दणाणून गेले होते.

बातमी शेअर करा
