आष्टी दि.२५ (प्रतिनिधी):तालुक्यातील शेंडगेवाडी (सावरगाव गड) येथील कामगार ऊसतोडणीसाठी जात असताना तिसगाव–शेवगाव रस्त्यावर समोरून येणाऱ्या ट्रकने बैलगाड्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत १४ जण गंभीर जखमी तर एक बैल ठार झाल्याची घटना गुरुवार (दि.२५) रोजी पहाटे घडली.घटनेची माहिती मिळताच आ.सुरेश धस घटनास्थळी दाखल
आष्टी तालुक्यातील शेंडगेवाडी (सावरगाव गड) येथील ऊसतोडणी कामगार वृद्धेश्वर साखर कारखाना पिंपळगाव कासार (तिसगाव) येथे ऊसतोडणीसाठी जात असताना तिसगाव–शेवगाव रस्त्यावर समोरून येणाऱ्या ट्रकने बैलगाड्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत बैलगाड्या सुमारे २०० फूट फरफटत गेल्या. सदरील घटनेची माहिती मिळताच आ.सुरेश धस यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले.या अपघातात ५ बैलांना गंभीर फ्रॅक्चर झाले असून एका बैलाचा जागीच मृत्यु झाला. १४ कामगार गंभीर जखमी झाले आहेत.या अपघातात गंभीर जखमी असलेल्या पूजा नाना शेंडगे (वय ३०),शरद शेंडगे (वय ४०) यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुगालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित १२ जखमी कामगारांवर तिसगाव येथे उपचार सुरू आहेत.जखमींमध्ये अभिषेक मरगळ, विशाल मरगळ, कोमल ठेंगल, राणी ठेंगल, सीमा शेंडगे, संगीता शेंडगे, राणी गोल्हार, बबन शेंडगे, लिलाबाई शेंडगे, आदित्य शेंडगे, अशोक ठेंगल व तुळजाई शेंडगे यांचा समावेश आहे. अनेकांना गंभीर इजा व हाडांचे फ्रॅक्चर झाले आहे. गुरुवार (दि.२५) रोजी पहाटे ६ वाजता सदरील घटनेची माहिती मिळताच आ.सुरेश धस यांनी पोलिस प्रशासनाला तातडीने कळविण्यात आले. त्यामुळे जखमींना मदत मिळून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस अधिकारी श्री.केदार,श्री.पालवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच तिसगाव येथील रुग्णालयात जखमींची भेट घेऊन डॉ.रानसिंग यांच्याकडून उपचारांची धस यांनी माहिती घेत रुग्णांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांना धीर दिला.तसेच पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पुजारी यांची भेट घेऊन या प्रकरणी योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
