Advertisement

स्टीलच्या दरात मोठी घट

प्रजापत्र | Monday, 19/09/2022
बातमी शेअर करा

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांसह व्यावसायिकांचीही चिंता वाढवली होती. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) महागाईचा भडका उडाला होता. युद्धामुळे मागणी आणि पुरवठा साखळीवर या युद्धाचा परिणाम झाला होता. युद्धाला सहा महिने उलटल्यानंतर ही जागतिक व्यापाराला बसलेली झळ काही प्रमाणात कमी झाली आहे. जगातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाल्याची चिन्हे दिसत आहे. महागाईला काही प्रमाणात आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनांचा परिणाम दिसू लागला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या स्टीलच्या दरात मोठी घसरण (Steel Price Reduce) झाली आहे. मागील चार महिन्यात स्टीलचे दर प्रतिटन 20 हजार रुपयांनी घसरले आहेत.  

 

 

बांधकामासाठी लागणाऱ्या स्टीलचे दर चार महिन्यानंतर घसरल्याने बांधकाम खर्च कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मार्च महिन्यात 85 हजार रुपये प्रतिटन असलेलेले स्टील 20 हजारांनी कमी झाले आहेत. सध्या स्टीलचा दर 65 हजार रुपये प्रतिटन इतका आला आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे मार्च महिन्यात स्टीलचे दर आजवरच्या सर्वात उच्चांकी म्हणजेच 85 हजार रुपये प्रति टनावरती पोहोचले होते. त्यानंतर आता स्टीलच्या दरात घसरण दिसून येत आहे.
 

Advertisement

Advertisement