परंडा (प्रतिनिधी) : तलाठी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी चंद्रकांत कसाब यांची निवड करण्यात आली आहे.
येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये मजहर जिनेरी यांच्या उपस्थितीमध्ये तलाठी कर्मचारी तालुका संघटनेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीमध्ये संघटनेतील तलाठी सदस्यांनी सर्वानुमते चंद्रकांत कसाब यांची तालुकाध्यक्ष म्हणून तर सचिव म्हणून महेश मुकदम यांचे नाव सुचविले. या नावांना बैठकीमधील सदस्यांनी सर्वानुमते सहमती दर्शवून निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष चंद्रकांत कसाब, उपाध्यक्ष योगेश जगताप, सचिव महेश मुकदम, सहसचिव आकाश वानखेडे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गुळमिरे, संघटक तुकाराम वाळके, महिला प्रतिनिधी अनिता पाटील, मार्गदर्शक व सल्लागार म्हणून संतोष खुळे, दुर्गाप्पा पवार, शेख सिद्दीकी, हिशोब तपासणीस विकास नागटिळक यांची कार्यकारणी जाहीर करून नूतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मोनिका मसुगुडे, किरण शिंदे, विष्णू जाधव, उमाकांत उसतुरे, विनोद चुकेवाड, महेश सातपुते, गुणाजी ढोणे, महेबूब आत्तार, व्ही. व्ही. कोळी, उल्हास भोसले, मंडळ अधिकारी आबासाहेब सुरवसे, महादेव कांबळे, प्रशांत गवळी यांच्यासह महसूल कर्मचारी उपस्थित होते.