Advertisement

उत्सपूर्त वातावरणात पार पडला पालक मेळावा

प्रजापत्र | Tuesday, 13/09/2022
बातमी शेअर करा

पुणे-बा.मा.पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बिरदवडी. चाकण मध्ये शैक्षणिक वर्ष  सन 2022/23 प्रथम पालक मेळावा इयत्ता 8 वी ते 12वी उत्सपूर्त वातावरणात पार पडला.

   याप्रसंगी शिक्षक पालक संघाच्या कार्याध्यक्षपदी पालक सर्वानुमते मुस्तफा शेख, उपाध्यक्षपदी गोरक्षनाथ दवणे, खजिनदार पदी शरद मांडेकर,खजिनदार,पल्लवी पडवळ व सहसचिव पदी उज्वला काळडोके यांची निवड करण्यात आली.सर्व पदाधिकारी, सर्व नवनिर्वाचित पालक संघाचे सदस्य यांचे ज्योतिबा एज्युकेशन सोसायटी संचलित बिरदवडी.अध्यक्षा प्रा. देवयानी पवार मॅडम, सचिव ईशान यशवंत पवार व सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे प्र. मुख्याध्यापक विजय चव्हाण सर, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक पालक संघ प्रमुख श्री.अनिल चौगुले सर यांनी केले,तर आभार प्रदर्शन क्रीडा विभाग प्रमुख श्री. दादासाहेब ढाकणे सर यांनी केले.

Advertisement

Advertisement