Advertisement

परळीत गुटख्याचा टेम्पो पकडला

प्रजापत्र | Tuesday, 13/09/2022
बातमी शेअर करा

परळी-वैजनाथ (प्रतीनिधी) - शहरातील विद्यानगर भागात विक्री साठी आणलेला गुटखयाने भरलेला छोटा हत्ती (टेम्पो) अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या पथकाने पकडुन 4 लाख 59 हजार  803 रूपयांचा गुटखा वाहनासह जप्त केला असुन या प्रकरणी दोघा जणांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

         परळी शहरातील विद्यानगर भागात एका वाहनातून गुटखा विक्रीसाठी आणण्यात आल्याची गुप्त माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांना मिळताच सोमवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता अनिल दौंड, उपनिरीक्षक शिंगाडे मॅडम,,चांद मेंडके,पोना.देवकते,पोशि. राऊत,,खंदारे,व ईतर दोन खाजगी व्यक्तीनी छापा टाकला असता महिन्द्रा जितो टेम्पो मधे राजनिवास पान मसाला,बाबा पानमसाला,रत्ना सुगंधित तंबाखू, विमल पान मसाला,आर.एम.डी.गुटखा,बाबा तंबाखु,असा 59803 रुपयाचा गुटखा व गुटखा विक्री साठी आणलेले वाहन असा एकुण 4 लाख 59 हजार 803 रूपयांचा गुटखा जप्त करत दोघा विरूद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात कलम 328,272,273 भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Advertisement

Advertisement