Advertisement

बीड जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत, द्या अग्रीम नुकसान भरपाई

प्रजापत्र | Tuesday, 13/09/2022
बातमी शेअर करा

बीड : अतिवृष्टी , गोगलगाईंचा फटका यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यांना तातडीने अनुदान आणि विम्याची अग्रीम मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते तथा येडेश्वरीचे अध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी केली आहे. 

 

 सोनवणे यांनी म्हटले आहे की , अतिवृष्टी अनुदान, गोगलगाय मुळे नुकसान, गुरावर आलेला लंपी रोग, ॲागस्ट महिण्यात न पडलेला पाऊस अश्या अनेक संकंटामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. सोयाबीन बरोबर मूग,उडीद, कापूस या पिकांना देखील पावसाचा फटका बसलेला आहे . अशा वेळी राज्यसरकार ने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे की काय असा प्रश्न पडतो. त्यातच भर म्हणून की काय बीड जिल्ह्यातील 47 महसूल मंडळे अग्रीम रक्कमेपासून वगळण्यात आली हा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर झालेला अन्याय आहे.राज्य सरकारने तातडीने दखल घेऊन बीड जिल्ह्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याची भूमिका घ्यावी तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25% अग्रीम रक्कम मिळावी अशी   सरकारकडे आग्रही मागणी  असल्याचे सोनवणे यांनी म्हटले आहे. 
 

Advertisement

Advertisement