Advertisement

​​​​​​​कोकणसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा-विदर्भात यलो अलर्ट

प्रजापत्र | Thursday, 08/09/2022
बातमी शेअर करा

राज्याच्या अनेक भागात पाऊस कोसळत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर यासह मराठवाडा आणि विदर्भात देखील मुसळधार पावसाच्या सरी कोसळताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजपासून राज्यातील पावसाचा जोर आणखीणच वाढणार असून, सकाळापासून अनेक भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने आज कोकणासह, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तसेच पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.

 

 

 

रात्रीपासून नवी मुंबईसह पनवेल परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. तर तिकडे मराठवाड्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली असून, औरंगाबाद, जालना, परभणी या जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस पडला. तसेच दिवसभराच्या दमट वातावरणानंतर नागपुरात देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.
 

Advertisement

Advertisement