Advertisement

राज्यातील 1166 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

प्रजापत्र | Wednesday, 07/09/2022
बातमी शेअर करा

राज्यातील 18 जिल्ह्यांमधील 82 तालुक्यांमधील 1166 ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाली असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी 14 ऑक्टोबर रोजी पार पडणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी सांगितले. यंदाच्या निवडणुकीपासून सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे. 

 

 

असा आहे निवडणूक कार्यक्रम
संबंधित तालुक्यातील तहसीलदार 13 सप्टेंबर 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज 21 ते 27 सप्टेंबर दरम्यान दाखल करता येतील. मात्र, 24 आणि 25 सप्टेंबर 2022 रोजी शनिवार-रविवारची सुट्टी असल्याने या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. दाखल झालेल्या अर्जांची छाननी 28 सप्टेंबर 2022 रोजी पार पडणार आहे. तर, 30 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. ग्रामपंचायती निवडणुकीचे मतदान 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत पार पडणार आहे. मतमोजणी दुसऱ्याच दिवशी 14 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे.

 

Advertisement

Advertisement