Advertisement

निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबाबत पुढील सुनावणी 27 सप्टेंबर रोजी

प्रजापत्र | Wednesday, 07/09/2022
बातमी शेअर करा

पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाला (Election Commission Of India) कार्यवाही करण्याची परवानगी देण्याबाबत आदेश देण्याच्या मागणीसाठी शिंदे गटाने (Shinde Group) दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) घटनापीठासमोर आज सुनावणी झाली. घटनापीठाने  27 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले आहे. पुढील सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. पुढील सुनावणीत सुप्रीम कोर्ट महत्त्वाचे आदेश देण्याची शक्यता आहे. 

 

 

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी मागील दोन महिन्यांपासून लांबली आहे. मंगळवारी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला कार्यवाही करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आज हे प्रकरण घटनापीठा समोर आले. न्या. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी शिंदे गटाचे वकील अॅड. नीरज कौल यांनी निवडणूक आयोगाला कार्यवाही करण्यास परवानगी द्यावी. जेणेकरून निवडणूक आयोग पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घेईल. त्यानंतर घटनापीठाने 27 सप्टेंबर रोजी सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले. या सुनावणीत पक्षकारांचे म्हणणे ऐकले जाणार असल्याचे न्या. चंद्रचूड  यांनी सांगितले. 
 

Advertisement

Advertisement