Advertisement

भारतातील सर्वात मोठा कार चोर

प्रजापत्र | Tuesday, 06/09/2022
बातमी शेअर करा

दिल्ली पोलिसांनी सोमवारी अनिल चौहान नामक देशातील सर्वात मोठ्या कार चोराला बेड्या ठोकल्या. अनिल चौहानवर तब्बल 5000 कार्स चोरल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 52 वर्षीय अनिलने चोरीच्या पैशांतून दिल्ली, मुंबई व ईशान्य भारतात अनेक मालमत्ता खरेदी केल्या आहेत. तो श्रीमंतीचे आयुष्य जगत होता. त्याला 3 बायका व 7 मुले आहेत.

 

 

पोलिसांनी हा देशातील सर्वात मोठा कार चोर असल्याचा आरोप केला आहे. त्याने 27 वर्षांत 5 हजारांहून अधिक कार चोरल्या. सेंट्रल दिल्ली पोलिसांच्या विशेष अधिकाऱ्यांना अनिलच्या कारवायांची खबर मिळाली होती. त्यानंतर त्याच्या देशबंधू गुप्ता मार्गावरून मुसक्या आवळण्यात आल्या. पोलिसांनी त्याच्याकडून 6 पिस्तूल व 7 काडतुसे जप्त केली आहेत.

Advertisement

Advertisement