उस्मानाबाद दि.५ (प्रतिनिधी) - तालुक्यातील गडदेवदरी येथे तगर भूमी जेतवन बुद्ध विहाराची निर्मिती करण्यात येत आहे. त्यानिमित्त वर्षावास महोत्सवाच्या आयोजन दि.११ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त उपसकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या महोत्सवास उस्मानाबाद जिल्हा विभागीय अध्यक्ष पूज्य भंते महाविरो थेरो, सचिव पूज्य भंते पयानंद थेरो, पूज्य भिख्खू सुमेधजी नागसेन व संघ धम्म देसना देणार आहेत. या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी माजी नायब तहसिलदार पी.एम. सोनटक्के तर पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी महेंद्र कांबळे, भूमच्या तहसिलदार उषाकिरण शृंगारे, सुहास हजारे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थितांमध्ये राजाभाऊ ओव्हाळ, धनंजय शिंगाडे, प्रा. संजय कांबळे, विशाल शिंगाडे, दिलीप भालेराव, सिद्धार्थ बनसोडे, पृथ्वीराज चिलवंत, राणा बनसोडे, प्रवीण रणबागुल, दिग्विजय शिंदे, मेसा जानराव, शाम बनसोडे, अनिल हजारे, राम कांबळे, चेतन शिंदे, नितीन वाघमारे, प्रा.महेंद्र चंदनशिवे, अण्णा उबाळे, रावसाहेब शिंगाडे, गणेश वाघमारे, प्रमोद हावळे, धनंजय वाघमारे, राजाराम वाघमारे, सतीश खांडके, मनोज आवचारे, सहाय्यक गट विकास अधिकारी सुरेश तायडे, नाय तहसीलदार चंद्रकांत शिंदे, डॉ. सुधीर शिंदे, धवल सावंत, सुखदेव मस्के, नवज्योत शिंगाडे, भिकाजी शिलवंत, आकाश वाघमारे, देविदास हावळे, सुदेश माळाळे, कमलाकर बनसोडे, दीपक बनसोडे, सचिन वाघमारे, गौतम आंबेवाडीकर, समाधान जोगदंड, आदीसह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात चिवरदान संगीता डावखरे, विमल रणदिवे, मीरा शिंदे, सुनील सोनवणे व संजय कांबळे हे करणार आहेत. हा महोत्सव रविवार दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे या धम्म देसणा महोत्सवास जास्तीत जास्त बौद्ध बांधवांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे यांनी केले आहे.