Advertisement

राष्ट्र सेवा दलाचे दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

प्रजापत्र | Monday, 05/09/2022
बातमी शेअर करा

नळदुर्ग  : विज्ञाननिष्ठा, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद, लोकशाही, व समाजवाद ही सेवादलाची पंचसुत्री आहेत . त्या संकल्पने अनुसार  मराठवाडयातील कार्यकर्त्यांसाठी १० व ११ सप्टेंबर  २०२२ रोजी  दोन दिवसाचे  शिबीर आपले घर, नळदुर्ग ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद येथे  आयोजन करण्यात आले आहे.   शिबिरात जास्तीत जास्त युवक,युवती ,सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकानी केले आहे.

 

 

शिबिराची वेळ शनिवार  १० सप्टेंबर रोजी  सायंकाळी ५ वाजता, शिबीराची सुरूवात होणार असुन पहिल्या सत्रामध्ये 'राष्ट्रवादाचा खरा अर्थ' या विषयी चर्चा होणार आहे. दुसऱ्या दिवशी  रविवार ११  सप्टेंबर रोजी सकाळी ९  ते १२ आर्थिक प्रश्न व समाजवादी धोरण' या विषयी  चर्चासत्र आयोजित केले आहे.  

 

 

तसेच दुपारी  १२ ते १  या वेळेत अभ्यास मंडळे चालवणे,  शिबीरे संघटीत करणे व पुढील दिशा ठरवणे या विषयी चर्चा होणार आहे ,या शिबिरासाठी मान्यवरांचे मार्गदर्शन मिळणार आहे ,या शिबिरात जास्तीत जास्त युवक,युवती ,सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकानी केले आहे.

 

 

सहभागी कार्यकत्यांच्या  निवास व भोजनाची सोय जिल्हा समिती च्या वतीने करण्यात आली आहे.  शिबिराच्या नोंदणी साठी सचिव गुंडूदादा पवार ७०३७८८२९१५ , व्यवस्थापक विलास वकील ९५२७४०३२९६  या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Advertisement

Advertisement