Advertisement

भाजीपाला विक्रीसाठी निघालेल्या पितापुत्राचा कारच्या धडकेत जागीच मृत्यू

प्रजापत्र | Friday, 02/09/2022
बातमी शेअर करा

आष्टी : भाजीपाला विक्रीसाठी दुचाकीवरून जाणाऱ्या बापलेकाचा भरधाव कारने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. हा अपघात बारामती-पैठण रोडवरील चोभानिमगांव येथे आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास झाला.

 

 

अरूण सोन्या आबा औटे आणि सुरज अरूण औटे अशी मृतांची नावे आहेत. आष्टी तालुक्यातील नांदा येथील औटे पितापुत्र शेती करतात. आज सकाळीच दोघेही शेतातील भाजीपाला विक्रीसाठी कड्याकडे दुचाकीवरून घेऊन जात होते. दरम्यान, कड्यावरून मिरजगावकडे जाणाऱ्या एका भरधाव कारची आणि दुचाकीची चोभानिमगांव जवळ समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच कडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घरातील दोन कर्ते पुरुष मृत झाल्याने औटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Advertisement

Advertisement