नवी दिल्ली-राष्ट्रीय तपास संस्थेनं (एनआयए) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्याला २५ लाखांचं रोख बक्षीस देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. दाऊदसोबतच त्याचा राईट हँड समजला जाणारा कुख्यात गुंड छोटा शकील याच्यावर २० लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.
भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी दाऊदनं सध्या एक युनिट स्थापन केली असल्याची माहिती गुप्तचर खात्याला मिळाली आहे. येत्या काळात भारतात दहशतवादी हल्ला किंवा देशातील बड्या राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याचा प्लान या युनिटकडून राबवला जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एनआयए सतर्क झाली असून भारतासाठी वॉन्टेड असलेल्या गुन्हेगारांवर बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.
बातमी शेअर करा