उमरगा : येथील तक्रारदाराने त्याच्या शेतामध्ये घर बांधण्यासाठी चार ट्रक वाळू ची आवश्यकता होती. त्या वाळू ट्रक वर कारवाई न करण्यासाठी वीस हजार रुपये लाच स्विकारताना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , तक्रारदार यांना त्यांच्या शेतामध्ये घराचे बांधकाम करायचे असल्याने त्यांना चार ट्रक वाळूची आवश्यकता होती.म्हणून तक्रारदार 24 ऑगस्ट रोजी पंचांसह उमरगा तहसीलदार राहुल पाटील यांची शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. उमरगा तहसीलदार यांनी मध्यस्थी मार्फत चार ट्रक वाळू घेण्यासाठी व त्या वाहनावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांना एका ट्रकला 5000/- रुपये प्रमाणे चार ट्रक वाळूसाठी 20,000/- रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. 20,000/-स्वीकारण्याचे पंचा समक्ष मान्य करून 20 हजार रुपये स्वीकारले. या वेळी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
यावेळी सापळा अधिकारी अशोक हुलगे, पोलीस निरीक्षक, सहायक सापळा अधिकारी विकास राठोड,पोलीस निरीक्षक,तर मार्गदर्शक मा.डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, मा.श्री.विशाल खांबे,अपर पोलीस अधीक्षक, मा. श्री. प्रशांत संपते, पोलीस अंमलदार दिनकर उगलमूगले,विष्णू बेळे , विशाल डोके, जाकेर काझी यांचा सहभाग होता.