Advertisement

धुंडिराज शास्त्रीचें निधन

प्रजापत्र | Saturday, 16/07/2022
बातमी शेअर करा

बीड : येथील अध्यात्मिक क्षेत्रातील मोठे व्यक्तिमत्व असलेल्या थोरले पटांगण येथील धुंडिराजशास्त्री पाटांगणकर यांचे काही काही वेळापूर्वी निधन झाले आहे. धुंडिराजशास्त्री यांच्यावर   येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्या दरम्यान आज त्यांचे निधन झाले.
धुंडिराज शास्त्री हे बीडचे अध्यात्मिक वैभव होते. बीड शहरात थोरले पाटांगण हे मोठे अध्यात्मिक पीठ मानले जाते, या माध्यमातून त्यांनी अध्यात्मिक सेवा केली. त्यांचा वेदांचा गाढ अभ्यास होता . त्यांच्या निधनाने अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. 

Advertisement

Advertisement