बीड दि.२९ (प्रतिनिधी): शहरातील धानोरा रोडची अवस्था अतिशय दयनिय झाली आहे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.मात्र नगरपालिका प्रशासन दखल घेत नसल्यामुळे साहस आदोडे, नितेश उपाध्ये यांच्यासह त्या भागातील नागरीकांनी मंगळवार (दि.२९) रोजी दुपारी खड्ड्यांच्या पाण्यामध्ये लोटांगण घेत आंदोलन केले.
बीड (Beed)शहरातील नगर रोड ते पालवण चौक (धानोरा रोड) या पावणे दोन किलोमिटरच्या रस्त्यावर प्रचंड खड्डे झाले आहेत. त्याचबरोबर मदर तेरेसा चौक ते अंकुश नगर मुख्य रस्ता, विठ्ठल चौकापर्यंतच्या रस्त्याची देखील अतिशय दयनिय अवस्था झाली आहे. एवढे प्रचंड खड्डे पडलेले असतानाही नगर पालिका कसलीच दखल घेत नसल्यामुळे साहस आदोडे, नितेश उपाध्ये यांच्यासह त्या भागातील नागरीकांनी आज मंगळवार (दि.२९) रोजी दुपारी खड्ड्यांच्या पाण्यामध्ये लोटांगन घेत नगर पालिकेचा निषेध नोंदवला.नगर पालिका हाय-हाय असे म्हणत आंदोलकांनी थेट खड्ड्यात बसुन आंदोलन केले. दरम्यान नगर रोड, पालवण चौक या रस्त्यांसह छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बशीरगंज, राजुरीवेस, जुना बाजार या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. मात्र नगर पालिकेने खड़े दुरुस्त करण्याऐवजी लोकांवर खड्ड्यांमध्ये लोटांगन घ्यायची वेळ आणली आहे. बीड शहरात प्रत्येकजण नगर पालिकेच्या नावाने रोष व्यक्त करत असतांनाही नगर पालिका प्रशाननाला त्याचे काहीच वाटत नसल्याने त्यांनी नाकला गुंडाळली का ? असा प्रश्न नागरीकांमधुन उपस्थित होऊ लागला आहे.