Advertisement

ग्रामसेवकाचा अपघाती मृत्यु

प्रजापत्र | Thursday, 14/04/2022
बातमी शेअर करा

माजलगाव : दुचाकीला समोरून आलेल्या ऑटो रिक्षाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तालुक्यातील सांडसचिंचोली येथील ग्रामसेवक जितेंद्र दत्तात्रय हरदास (वय ४५, रा. गित्ता रोड, अंबाजोगाई) यांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कल्याण-विशाखापट्टणम मार्गावर हा अपघात झाला.

 

माजलगाव पंचायत समितीमध्ये ग्रामसेवक जितेंद्र दत्तात्रय हरदास हे तालुक्यातील सांडसचिंचोली येथे नियुक्त आहेत. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास ते माजलगाव येथून सजावर जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. परभणी रोडने जाताना समोरून आलेल्या ऑटो रिक्षाने जोरदार धडक दिली. या अपघातात हरदास हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून बीड जिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती. दरम्यान, सायंकाळी जितेंद्र हरदास यांच्यावर अंबाजोगाई येथील बोरूळ तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
 

Advertisement

Advertisement