Advertisement

धानोरा बुद्रुक येथे 12 एकर ऊस जळून खाक

प्रजापत्र | Monday, 07/02/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई: शेतातून गेलेल्या वीज तारेच्या घर्षणामुळे ठिणग्या पडून तोडणीस आलेला तीन शेतकऱ्यांचा 12 एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील धानोरा (बु) येथे घडली. यामुळे शेतकऱ्यांचे पंधरा लाख रुपयांचे नुकसाने झाले आहे.

 

 

धानोरा बु येथे गट क्र. 228 मध्ये शेतकरी बालासाहेब विश्वनाथ सोमवंशी, व्यंकट भागवत सोमवंशी, भाऊसाहेब विश्वनाथ सोमवंशी या तीन शेतकऱ्यांचा 12 एकर ऊस आहे. या शेतातुन महावितरण कंपनीची वीज तार गेलेली आहे. शुक्रवारी दुपारी या तारांचे एकमेकांवर घर्षण झाल्याने ऊसावर ठिणग्या पडल्याने ऊसाने पेट घेतला. ऊसाला लागलेल्या आगीने तोडणीस आलेला 12 एकर ऊस जळून खाक झाला. यामुळे तीन शेतकऱ्यांचे पंधरा लाख रुपयांचे नुकसाने झाले आहे. यामुळे हे तीनही शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

 

 

महावितरणने केला पंचनामा
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच महावितरण कंपनीचे साहय्यक अभियंता संजय देशपांडे, महसुल प्रशासनाच्या वतीने पंचनामा करण्यात आल. यावेळी पोलीस उपस्थित होते. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या शेतकऱ्यांना प्रशासनाच्या वतीने तात्काळ मदत देण्याची गरज आहे.

Advertisement

Advertisement