Advertisement

१६ दिवसांत चार जामिन याचिका फेल, तरी आर्यन खानने वाजविली उच्च न्यायालयाची 'बेल'

प्रजापत्र | Wednesday, 20/10/2021
बातमी शेअर करा

मुंबई-गेल्या आठवड्यात दोन वकील आणि तब्बल दोन दिवस जामिनासाठी युक्तीवाद करूनही आर्यन खानला आज जामिन मिळाला नाही. स्पेशल NDPS कोर्टाने आर्यन खानसह तिघांचा जामिन नाकारला. गेल्या १६ दिवसांत आर्यन खानवर ही चौथ्यांदा वेळ आली आहे. यामुळे आता जामिनासाठी आर्यनच्या वकिलांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. 

स्पेशल NDPS कोर्टाचे न्यायधीश व्ही व्ही पाटील यांनी आज आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट यांची जामिन याचिका फेटाळली. तीनदा जामिन फेटाळल्याने आज जामिन मिळेल अशी आशा शाहरुख खान, वकिलांना होती. मात्र, त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले. आता पुन्हा काही दिवस आर्यनला तुरुंगात रहावे लागणार आहे. यावर समीन वानखेडेंनी 'सत्यमेव जयते' म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. 

दरम्यान, आर्यन खानला जामिन मिळण्यासाठी शाहरुख खान जंग जंग पछाडत आहे. NDPS कोर्टाने दिलेली आदेशाची कॉपी घेऊन उच्च न्यायालयात जामिन याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्या खंडपीठासमोर जामिन याचिका दाखल करण्यात आली आहे. आर्यन खानला लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.         

 

Advertisement

Advertisement