Advertisement

बबन शिंदे यांचे निधन

प्रजापत्र | Saturday, 16/10/2021
बातमी शेअर करा

नेकनूर :   नेकनूर च्या राजकारणातील सर्वसामान्य नागरिकांच्या कामासाठी रस्त्यावर उतरून काम करणारे एक धुरंधर  परिचित असणारे माजी जिल्हा परिषद सदस्य बबन शिंदे यांचे आज निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. 
बबन शिंदे  यांनी १९८० ते १९८५ या काळात नेकनूर चे सरपंच पद भूषविले .केशरकाकू यांच्या बरोबर काम करतांना त्यांना १९९२ सालीजिल्हा पुरीषदेचे  तिकीट नाकारण्यात आले. त्यावेळी ते अपक्ष निवडणून आले. त्यांनी काहीकाळ गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू म्हणूनही  काम केले . अनेक वेळा मुंडे यांनी  निवडणूक लढवण्याचा आग्रह करूनही त्यांनी निवडणूक लढवली नाही. त्याच बरोबर शिवाजीराव  पंडित , अशोक पाटील ,जयदत्त क्षीरसागर  यांच्या सोबतही  काम करत  त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली .त्यांचे आज  निधन झाले . त्यांच्या पश्चात एक मुलगा , चार मुली , सुन , नातवंडे असा मोठा परिवार आहे.  शिंदे कुटूंबियांच्या दुःखात प्रजापत्र परिवार सहभागी आहे

Advertisement

Advertisement