पाटोदा दि.२४(प्रतिनिधी): येथील शहिद चौकातून दुचाकीवर जात असलेल्या पती-पत्नीला चौकातील बॅनरमुळे (Bus)एसटी वाहन चालकाला दुचाकी न दिसल्याने झालेल्या (Accident)भिषण अपघातात घाटेवाडी येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यु झाल्याची घटना गुरुवार (दि.२४) रोजी दुपारी घडली.
पाटोदा येथील रोहतवाडी परिसरातील घाटेवाडी येथील बाळू केशव वायकर व लता बाळू वायकर हे पती पत्नी ग्रामीण रूग्णालय पाटोदा येथून शहिद चौक मार्गे जात असतांना एसटी क्रमांक एम.एच.१४.एन.एक्स. ८९६२ ही नांदेड डेपोची बस पाटोद्यावरून मांजरसुंब्याकडे जात असतांना शहरातील शहिद चौकात लावलेल्या बॅनरमुळे समोरून येणाऱ्या दुचाकीचा अंदाज न आल्यामुळे घाटेवाडी येथील वायकर दांम्पत्य झालेल्या अपघातात जागीच ठार झाल्याची घटना घडली.
बातमी शेअर करा