Advertisement

वडवणीत फोडले घर

प्रजापत्र | Thursday, 24/07/2025
बातमी शेअर करा

 वडवणी दि.२४(प्रतिनिधी):तालुक्यातील (Wadwani) हिवरगव्हाण येथील घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह नगदी रक्कम व दोन मोबाईल असा एकूण ३८,००० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना (Crime)मंगळवार (दि.२२) ते बुधवार (दि.२३) च्या दरम्यान रात्री घडली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

       अधिक माहिती अशी कि,वडवणी(Wadwani) तालुक्यातील हिवरगव्हाण येथील भगवान पांडुरंग झेंडे (वय ३०) यांच्या घराचा दरवाजा अज्ञात चोरटयांनी तोडून कपाटातील पाच ग्रॅमचे झुंबर व पेटीत ठेवलेले नगदी पंधरा हजार रुपये तसेच दोन मोबाईल असा एकूण ३८,००० हजार रुपयांचा ऐवज लंपास (Crime)केल्याची घटना मंगळवार (दि.२२) ते बुधवार (दि.२३) च्या दरम्यान रात्री घडली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध वडवणी पोलीस (Police)ठाण्यात बुधवार (दि.२३)रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Advertisement

Advertisement